Wednesday, April 27, 2016

श्री जोतिबा

कोल्हापूर जिल्ह्याच्या कीर्तीत, ऐश्वर्यात भर घालणारे व दख्खनचा राजा म्हणून ओळखले जाणारे श्री जोतिबा हे तीर्थक्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील हजारो कुटुंबांचे कुलदैवत आहे. कोल्हापूरपासून 15 कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून 3100 फुट उंचीच्या डोंगरावरील हे स्थान निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीस दैत्यसंहारात सहाय्य करण्यासाठी हिमालयातील केदारनाथ दक्षिणेत जोतिबाच्या रूपाने आल्याचे मानतात. ब्रह्म, विष्णू, महेश आणि जमदगAी या चौघांचे मिळून तेज:पुंज रुपक म्हणजेच ज्योतिर्लिग. त्याचे लोकसंस्करण म्हणजेच जोतिबा असेही मानतात. जोतिबाची
मूर्ती चतुभरुज असून त्याच्या हातात खडग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ ही आयुधे आहेत. डोक्यावर कोल्हापुरी पध्दतीची पगडी असलेल्या जोतिबाचे घोडा हे वाहन आहे. मूळ मूर्ती 12 व्या शतकातील असून कांही वर्षापूर्वी तिच्यावर वजल्रेप केलेला आहे.