बिरोबा वीरभद्र महाराज

सत्य युगात श्री बिरोबा यांचा जन्म कृष्णा नदी काठी चंदनगिरी येथे पिता श्री बाळ भरमदेव आणि माता गंगा सोरावंती यांच्या पोटी झालेला होता. नगरी पट्टण नारद हे श्री बिरोबा यांचे मामा होते. बालपणीच नारदाने बिरोबाचा अत्यंत छळ केला. दैत्याना पाठवुन जन्म होताच बाळ बिरोबा यांना पाळण्या सहित अरण्यात नेऊन सोडले. नारदाचा हेतु दैत्यानी त्यांचा विनाश करावा असा होता. ते अवतारीक असल्यामुळे दैत्य त्याना मारू शकले नाहीत. कुदळीनंदण वनात पाळणा सोडुन ते परतले. मंदनगिरी येथे राहणाऱ्या श्री एकव्वा श्री मायव्वा या दोन भगिनी शेळ्या चारीत कुदळीनंदण वनात आले असता त्यांच्या नजरेस तो पाळणा पडला. त्यानी तो पाळणा उचलुन आपल्या बरोबर घरी नेला. त्या दोन भगिनीनी श्री बिरुदेवाचा मोठया वात्सल्याने सांभाळ केला. त्यास त्यानी लहानाचे मोठे केले. श्री बिरोबा लग्नाच्या वयात आल्यानंतर त्यानी नगरीपट्टण श्री नारद यांची मुलगी जिंकून आणुन कण कामावतीशी विवाह केला. नारदाने त्यांना पुष्कळ छळलेले होते. प्रौढ वयामध्ये श्री बिरोबा यांनी एकव्वा व मायव्वा देवाचासखा बफाणा त्यांच्या बरोबर संचार करीत, ते सर्वजन मुंगी पैठण येथे गेले. तेथील श्री केसुराया यांचा महारोग त्यानी बरा केला. राजाकडून दैत्याच्या संहारासाठी पंचडंगी, वायुघंघाळ काशिलिंग नावाचे शस्त्र करवुन घेतले. गोदावरी नदीकाठी श्री देवाचासखा बफाणा यांनी त्या शस्त्र निर्मितीसाठी आत्म समर्पण केले.
 पुढे बिरुदेवानी संचार करीत करीत नागठाण (जि. विजापुर) येथे आले. तेथे त्यानी नागदेवास वर दिला. तयार केलेल्या शस्त्राने क्वाण्यासुर, बागी-बंकासुर, शिगी -शिंखासुर, जोगासुर, कोपासुर, कणपेसुर, इत्यादी दैत्याचे पारिपत्य केले. व जनता भय मुक्त केली . चिंचली ता. रायबाग, जि. बेळगांव एकव्वा आणि मायव्वा नांदू लागल्या. या गावास तीर्थ क्षेत्राचे स्वरूप आले. आजही भारतातुन असंख्य भाविक नवान्न पोर्णिमेस चिंचली येथे जमत असतात. हालमत धर्माचे हे मोठे तीर्थ क्षेत्र आहे. त्यानंतर श्री बिरोबा यांनी आरेवाडी येथे आपली पत्नी कण कामावती येथे ठेवली. ते कायम स्वरूपी तेथेच स्थायिक झाले. त्यानंतर त्यानी गर्जनासुराचे मर्दन केले. त्यानी तेथे गजलिंगेश्वर नांव धारण करून अनेकांना संकटमुक्त केले. तेथील ऋषी मुनीना अभयदान दिले. त्यानी श्री बिरोबा यांना "निर्वाणेश्वर" हे नांव सन्मान पुर्वक बहाल केले. ज्या ठिकाणी गर्जनासुर यांचा वध केलेला होता. त्या ठिकाणाला घोडेगिरी असे म्हणतात (घोडेगिरीच्या परिसरांत बिरोबांचे भक्त निर्वाणेश्वर ऋषी म्हणायचे एकजण होऊन गेले) तेथे श्री बिरोबा यांने बारा वर्षे घनघोर तपश्चर्या केले. शेवटी शिवपार्वती कडुन त्यांनी वरदान मिळविले त्या प्रमाणे डोण हेग्गेरी (हल्ली डोणज ता. मंगळवेढा) येथे चोवीस वर्षे तपश्चर्या करीत काळ काढला. तेथेच त्यांची व महालिंगरायाची भेट डोणज तळ्यात झाली.
  श्री बिरोबा देवाच्या पदस्पर्शामुळे पावन होऊन भारतभर हजारो मंदीरे आहेत त्यापैकी काही प्रसिद्ध मंदीरे, श्री नागठाणसिद्ध (सैन्य जोत्याप्पा) मंदीर, नागठाण ता. विजापुर जि. विजापुर, श्री करेसिद्ध-बिरोबा मंदीर, क्वाननूर, ता. जमखंडी, जि. बागलकोट, श्री गजलिंगेश्वर व निर्वाणेश्वर मंदीर घोडेगिरी डोंगर ता. हुक्केरी, जि. बेळगांव. श्री बंकनाथ - बिरोबा मंदीर, बागी, ता. रायबाग, जि. बेळगांव. श्री कुरुडीलिंग-बिराप्पा मंदीर, एकसंबा, ता. चिक्कोडी, जि. बेळगांव, श्री शिडीयाण सिद्ध मंदीर, शिरढोण, ता. इंडी, जि. विजापूर, श्री करसिद्ध मंदीर, आलखनूर ता. रायबाग जि. बेळगांव श्री काशिलिंग बिरोबा व कामावती मंदीर, आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ जि. सांगली श्री संतोषा-बिरोबा मंदीर पांगरी व टाकेवाडी ता. माण, जि. सातारा श्री विठ्ठल-बिरदेव मंदीर पट्टण कोडोली, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर श्री अवघडखान-बिरोबा मंदीर, वाशी ,ता. करवीर, जि. कोल्हापुर श्री मुरसिद्ध मंदीर मुरगुंडी ता. अथणी, जि. बेळगांव श्री रायाव्हन्नूर-बिरोबा मंदीर व्हन्नूर ता. मंगळवेढा, सोलापूर श्री बिरुदेव मंदीर बारामती जि. पुणे श्री विठ्ठल-बिरुदेव मंदीर, मुंडे ता. कराड जि. सातारा श्री बिरुदेव मंदीर उमरगा, जि. उस्मानाबाद हजारदरीच (सावीरकव्वाळ) श्री काशिलिंग बिरोबा मंदीर ता. जमखंडी, जि. बागलकोट श्री बिराप्पा मंदीर विजयवाडा (आंध्रप्रदेश) श्री संपलगी-बिराण्णा मंदीर बेंगळुरु त्याचप्रमाणे बिरेश्वर मंदिर ५६ देशात बिरोबाचे हजारो मंदिर आहेत. श्री विरभद्र बिरोबा मंदीर साकुर मांडवे ता. संगमनेर, जि. अहमदनगर श्री विठोबा-बिरोबा मंदीर , सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव जि. सातारा श्री बिरुदेव मंदीर , काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे श्री विठोबा-बिरोबा मंदीर , उंडवडी ता. बारामती जि. पुणे श्री वीरभद्र बिरोबा चिंचबन शिर्डी,  राहता जि. अहमदनगर श्री बिरोबा मंदीर,  कोल्हार ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर

No comments:

Post a Comment